भिंगार: वाहनअडून आरोपीवर प्राणघातक हल्ला ; भिंगार मध्ये घटनाअहमदनगर: भिंगार ठाण्याचे पोलीस फरार आरोपीला ताब्यात घेऊन जात असताना इतर पाच आरोपींनी पोलिसांचे वाहन अडवून त्या आरोपीवर प्राणघातक हल्ला केला.नगर शहरातील भिंगार नाल्याजवळ रविवारी रात्री 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय 32 रा. मुकुंदनगर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार (22) हिने दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी सादीक बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रविवारी रात्री साडेसात वाजता आरोपीच्या घरी गेले होते. त्याला घेऊन जात असताना पाच आरोपींनी भिंगार नाल्याजवळ पोलिसांचे वाहन अडवून सादिकला मारहाण केली. ही घटना मी प्रत्यक्षात पाहिली असल्याचे रुक्सार सादिक हिने फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेला सादिक याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Karjat Strike : दूध दर वाढीसाठी कर्जतमध्ये आमरण उपोषण
Strike : कर्जत : चारा टंचाई,(Fodder shortage) पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांचे औषधोपचार आणि पशु संगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला...
फोटो: मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान मोदी त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा देतात
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय राजधानीतील त्यांच्या निवासस्थानी गायींना...
वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याच्या मोदींच्या आश्वासनाचे काय झाले?
पाटणा – बिहारमध्ये 19 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची कॉंग्रेसने खिल्ली उडवली आहे. वर्षाला 2...
सरकारी गौण खनिजवर दरोडा?
सरकारी गौण खनिजवर दरोडा? नगर – जामखेड रस्त्याजवळ एका बाह्यवळण रस्त्याचं काम सुरु आहे.
त्यासाठी शासनानं एका शेतकर्याची...





