पोटहिस्स्याचा आता स्वतंत्र सातबारा मिळणार ,भूमी अभिलेख विभागाची विशेष मोहीम

पोटहिस्स्याचा आता स्वतंत्र सातबारा मिळणार ,भूमी अभिलेख विभागाची विशेष मोहीम

पोटहिस्स्याचा म्हणजे जमीन वाटपाचा स्वतंत्र सातबारा तयार करण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी अभिलेख पोटहिस्सा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सातबारे अभिलेख हिस्स्याप्रमाणे वेगळे केले जाणार आहेत , तसेच त्यांचे स्वतंत्र नकाशेही तयार केले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे यामुळे पोटहिस्स्यानुसार स्वतंत्र सातबारा उतारा काढता येईल ,त्यामुळे जमीनीच्या वादावर पडदा पडण्यास मदत होईल.

संगणीकृत सातबाऱ्यावर तलाठ्याच्या सहीची आवश्यकता नाही

महसूल विभागाने २३ नोव्हेंबर २०२० ला काढलेल्या आदेशानुसार ,शासकीय कामांसाठी तसेच अन्य ठीकाणी लागणार्‍या सात बारा व आठ-अ या कागदपत्रांसाठी आता तलाठ्यांची तसेच प्राधिकृत अधिकार्‍यांची सही घेण्याचे बंधन नाही , यानुसार महाभूमी संकेतस्थळावरुन डाउनलोड केलेला क्यू.आर.कोड असलेला संगणीकृत सातबारा आणि आठ-अ तसाच ग्राह्य धरला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here