
अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी येथील पोलिस स्टेशन मधील गु. र. नं. ४५१/२०२० नुसार ई.पी.को कलम ३७६ (२)(जे)(एन), ३६३,३६६,३४ तसेच लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ चे ५,६,७,८ प्रमाणे शहादेव रामभाऊ खेडकर, चंद्रकला शहादेव खेडकर, सूरज शहादेव खेडकर, अंकिता शहादेव खेडकर तसेच विधी संघर्षित बालका विरुद्ध अल्पवयीन मुलीवर पळून नेऊन बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणात अहमदनगर येथील ६ वे जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री. एस.व्ही. सहारे मॅडम यांचे न्यायालयात एकूण ४ साक्षीदार तपासण्यात असुन युक्तीवाद झाले. सदर प्रकरणात न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सबळ पुराव्या अभावी आरोपींची दि. ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. हाजी रफिक निजामभाई बेग यांनी युक्तिवाद केले असुन समवेत ॲड.रियाज बेग, ॲड. अयाज बेग व ॲड. फैजान अकील शेख यांनी काम पाहिले.