पैश्याच्या वादातून मैत्रिणीवर चॉपरने वार

पैश्याच्या वादातून मैत्रिणीवर चॉपरने वार

पुणे:- गर्लफ्रेंडला जेवण्याच्या बहाण्याने एका फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना सासवड रस्त्याजवळ एका फार्महाऊसमध्ये घडली आहे. याप्रकरणी बॉयफ्रेंडला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पैशांच्या वादातून त्याने हे कृत्य केले. आरिफ इसाक शेख (29, रा. ताडिवाला रस्ता) असे आरोपीचे
नाव आहे. काही दिवसांपूर्वी तरुणीने आरिफला पैसे दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही तो रक्कम परत देत नव्हता. त्यामुळे तरुणीने पैशांसाठी तगादा लावला होता. दरम्यान, 16 ऑगस्टला रात्री आरिफने तिला जेवण करण्याच्या बहाण्याने सासवड रस्त्यावरील एका फार्म हाऊसमध्ये नेले. तेथे त्यांच्यात पैशांमुळे वाद झाले. त्या रागातून आरिफने तिच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. मात्र, त्यावेळी तरुणीने त्याची माफी मागून पुन्हा पैसे मागणार नसल्याची ग्वाही दिली. त्यानंतर आरिफने तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडला मारहाण झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, आरिफनेच तिच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here