पैठणमध्ये चार महिलांचा भयंकर राडा, बस स्थानक परिसरातील घटना…

497
  • एकच बॉयफ्रेंडसाठी दोन अल्पवयीन मुलीची फ्रीस्टाईल मारमारीच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच बुधवारी पुन्हा पैठण शहरातील बस स्थानक जवळील काळीपिवळी पॉंईटवर चार महिला आपसात भिडल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी चारही महिलांवर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चार महिलांनी घातलेल्या गोंधळाने पैठण शहरात सध्या चर्चेला उधान आले आहे.
  • मिळालेल्या माहिती नुसार पैठण येथील बस स्थानक परिसरातील काळी पिवळी स्टॉपवर बुधवारी दुपारी चार महिलांमध्ये ठेकेदाराने दिलेल्या पैश्याच्या वाटपामुळे आपसात वाद सुरू झाला, हा वाद इतका विकोपाला गेला की बघता बघता वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. महिलांनी एकमेकीचे केस ओढत बराच वेळ गोंधळ घातला.
  • भर रस्त्यावर सुरू असलेली महिलांची हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प पडली. महिलांची भाषा वेगळीच असल्याने नेमके वादाचे कारणही कुणाला समजून येत नव्हते. यामुळे मध्यस्थी कुणी करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस कॉन्स्टेबल विनायक आडे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना माहिती दिली.
  • तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, महिला उपनिरीक्षक स्वाती लहाने, जमादार सुधीर ओव्हाळ, जीप चालक भाऊसाहेब तांबे घटनास्थळी पोहोचले गोंधळ घालणाऱ्या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. याबाबत पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या महिलांवर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here