पेन्शनर व फॅमिली पेन्शन घेणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे.

1458
Vector illustration cartoon grandfather got a plastic credit card. Old man holding an electronic card payments. Receive a pension. Loan for pensioner. Concept of a happy old age, retirement.

. पेन्शनर व फॅमिली पेन्शन घेणाऱ्या
सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे.

भारत सरकार ने दिनांक १५-०५-२०२० रोजी पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना एक महत्वाची सूचना वजा ऑर्डर देणेसाठी एक पत्र प्रसिद्ध केले आहे या पत्राचे थोडक्यात मराठी रूपांतर.

पत्राचा विषय– पेन्शन व फॅमिली पेन्शन देणाऱ्या बँकांना सूचना

१) बँकेला पहिली पेन्शन खात्यावर जमा करून देण्यासाठी पेन्शनरला बँकेत बोलावता येणार नाही. तशी सक्ती करता येणार नाही. कारण जर खात्यावर जास्तीचे पैसे आलेतर वसूल करण्यासाठीची ऍथॉरिटी P P O बरोबर बँकेला दिली असते.

२) पेन्शन धारक मयत झाल्यावर त्याच्या पत्नीस किंवा नवऱ्यास ( वारासदारास) फॉर्म नुंबर १४ भरून देणेस बँकेत बोलावू नये. कारण वारसदारास फॅमिली पेन्शन देण्याची ऑर्डर आधीच P P O बरोबर बँकेला दिली असते.
बँकेनी फक्त मृत्यूचा दाखला मिळाल्यानंतर वारसदारची ओळख P P O वरून करून KYC फॉर्म भरून घेऊन फॅमिली पेन्शन सुरु करून देणे ही आहे. त्याचे कॅल्क्युलेशन बँकेनेच करायचे आहे. या कामासाठी वारसदार बँकेत आला पाहिजे असा आग्रह बँकेस करता येणार नाही.

३) जर पेन्शन खाते अगोदरच जॉईंट अकाउंट असेल तर, बँकेस फॅमिली पेन्शनरला नवीन खाते उघडण्यास सक्ती करता येणार नाही.

४ /५) ग्रुप A ऑफिसरला पेन्शन नंतर एक वर्षांनी “दुसरी नोकरी करत नसल्याचे प्रमाणपत्र” मागण्याची सक्ती करता येणार नाही. जर संबंधित ऑफिसरने बँकेला पत्र दिले तरच बँक पेन्शन देण्याचे बंद करू शकेल.

६) ७) आणि ९) जर फॅमिली पेन्शन जर त्याच्या मुलास,मुलीस किंवा अपंग मुलं मुलीस मिळत असेल तर अश्या लोकांनी बँकेस “दुसरे कुठलेही उत्पन्न नाही” असे प्रमाणपत्र दर वर्षी नोव्हेंबर मध्ये देणायचे कारण नाही. बँकेने ते मागू नये. जर मुलीस पेन्शन मिळत असेल तर दर सह महिन्यास लग्न न झाले बद्दल जे प्रमाणपत्र द्यावे लागत होते ते आता देऊ नये. कारण असे प्रमाण मागण्याची सक्ती बँकेस करता येणार नाही.

जर अपंग व्यक्तीस पेन्शन मिळत असेल आणि अपंगत्व कायमचे असेल तर एकदाच तसे सर्टिफिकेट द्यायचे आहे, दर वर्षी नाही.

८) व १०) हयातीचा दाखला म्हणून बँकेने “जीवन प्रमाणपत्राचा दाखला” स्वीकारायचा आहे. तो आपण मान्यता प्राप्त संस्थेकडून मिळवून घेऊ शकता. त्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ८० वर्षे वरील लोक फॉर्म भरून देऊ शकतात.

हयातीचा दाखला बँक घरी येऊन सुद्धा घेण्याची सोय झाली आहे. त्यासाठी बँकेने फक्त ६० रुपये आकरायचे आहेत. तुमच्या मोबाइलला वर sms किंवा तुम्हाला ई-मेल येईल. त्याला तुम्ही अशी सुविधा घेणार आहात काय असा मेसेज आल्यावर तुम्ही होकार कळवायचा आहे.

१०) कम्युटेशन जी पेन्शन मधून वजा झालेली असते ती १५ वर्षांनी रिस्टोर होते. ती आता बँकेनेच करायची आहे. त्यासाठी पेन्शन धारकाने कोणताही अर्ज कोठेही करण्याची गरज नाही. जर त्या संबंधी माहिती PPO मध्ये मिळत नसेल तर बँकेने संबंधित विभागाकडून ती मिळवायची आहे. तसेच बँकेने फॅमिली पेन्शन मधून कम्युटेशन पेन्शन वजा करु नये, अशीही सूचना दिली आहे.

११) ८० वर्षे पूर्ण होतील त्या महिन्यापासून पेन्शन मध्ये, १०% वाढ मूळ निवृत्तिवेतनात देऊन बँकेने पेन्शन द्यायची आहे. हे काम आपोआप होईल. कोणतेही लेटर देण्याचे कारण नाही. (८५ ते ९० वर्षे १५% आणि ९० ते ९५ वर्षे २०% व ९५ ते १०० वर्षे २५% व १०० पेक्षा अधिक वयाला ५०% पेन्शन वाढ होते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here