पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी! विधवा किंवा घटस्फोटित मुलीलाही मिळेल Family Pension चा लाभ…

पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी! विधवा किंवा घटस्फोटित मुलीलाही मिळेल Family Pension चा लाभ

Family Pension…फॅमिली पेन्शनचा लाभ विधवा (Widow) किंवा घटस्फोटित मुलीलाही (Divorcee Daughter) मिळू शकतो. पेन्शनर्स वेलफेअर विभागानं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे

मुंबई, 18 ऑगस्ट: सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन (Pension) हे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employee) उदरनिर्वाहाचे साधन असते. देशात आज कोट्यवधी केंद्र सरकारी (Central Government Employee) पेन्शनधारक आहेत. एखाद्या कुटुंबातील पेन्शनधारक कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला फॅमिली पेन्शन (Family Pension) मिळते. आता याबाबत काही अटी शर्तींसह नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अवलंबून असलेल्या मुलांना दोन पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय विधवा (Widow) किंवा घटस्फोटित मुलीलाही (Divorcee Daughter) पेन्शनचा लाभ मिळू शकतो. याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागानं (Pensioners Welfare Department) अलीकडेच ‘पेन्शनबाबतचे 75 मुख्य नियम’ नावाची एक सीरिज सुरू केली असून, याद्वारे जुन्या पेन्शनधारकांना जागरूक केले जात आहे.हे वाचा-Bombay Stock Exchange: शेअर बाजारात मोठी उसळी, आज Sensex ऑल टाइम हायवरआता नव्या नियमानुसार, एखाद्या कुटुंबामध्ये दोन व्यक्ती सरकारी कर्मचारी असतील तर एक व्यक्ती दोन पेन्शनचा लाभ घेऊ शकते. यामुळे एखाद्या मुलाचे आई आणि वडील दोघेही सरकारी कर्मचारी असतील तर त्या मुलाला पेन्शनचा लाभ घेता येऊ शकेल, मात्र यासाठी काही अटी आहेत.पती -पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील आणि त्यांच्यापैकी एकाचा सेवेदरम्यान किंवा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाला, तर फॅमिली पेन्शनचा लाभ जिवंत असलेल्या दोघांपैकी कोणालाही दिला जाईल. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला आणि पत्नीच्या मृत्यूनंतर पतीला या पेन्शनचा लाभ मिळेल. मात्र दोघेही मरण पावले तर हयात असलेल्या मुलाला आई आणि वडील दोघांच्या पेन्शनचा लाभ दिला जाईल. त्याचप्रमाणे विधवा किंवा घटस्फोटित मुलीलाही या पेन्शनचा लाभ मिळू शकणार आहे, मात्र यासाठीही काही अटी आहेत.हे वाचा-पतंजलीच्या IPO बाबत बाबा रामदेवांची मोठी घोषणा, सांगितला पुढचा प्लॅनआईवडिलांच्या मृत्यूनंतर मुलीच्या पतीचा मृत्यू झाला किंवा तिचा घटस्फोट झाला, तर तिला पेन्शन मिळणार नाही. मात्र आई-वडील हयात असताना मुलगी विधवा झाली किंवा तिचा घटस्फोट झाला किंवा घटस्फोटाचे प्रकरण स्पर्धात्मक न्यायालयात चालू असेल आणि त्या दरम्यान आई-वडिलांचा मृत्यू झाला तरीही त्या मुलीला पेन्शनचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत घटस्फोटाच्या दिवसापासून पेन्शन मिळेल.अविवाहित मुलगीही (Unmarried Daughter) फॅमिली पेन्शनसाठी दावा करू शकते यासाठी कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही. मुलगी अविवाहित असेल आणि जोपर्यंत ती नोकरी करत नाही किंवा तिचं लग्न होईपर्यंत तोपर्यंत तिला फॅमिली पेन्शनचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. विधवा किंवा घटस्फोटित मुलीला पुनर्विवाहापर्यंत फॅमिली पेन्शनचा लाभ दिला जाऊ शकतो. या निर्णयामुळे मुलींना दिलासा मिळाला आहे.ज्या सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची मुले अपंग (Handicap Child) असतील त्यांना पेन्शनचा लाभ देण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अपंग मुलांना सीसीएस (पेन्शन) नियम, 1972 अंतर्गत फॅमिली पेन्शनचा लाभ देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपंग मुलांनाही दिलासा मिळणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here