अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका) :- महाड तालुक्यातील पूरग्रस्त गावांमध्ये रायगड जिल्हा परिषद, महाड पंचायत समिती, नेहरू युवा केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्केप महाड, रूरल अँड यंग फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्याने प्लास्टिक संकलन मोहीम नुकतीच राबविण्यात आली.

यावेळी पूरग्रस्त 18 गावांमध्ये 50 स्वयंसेवकांनी 2 टन प्लास्टिक व बॉटल कचरा संकलित केला. तसेच जमा करण्यात आलेले प्लास्टिक पुनर्निर्माण प्रक्रियेसाठी कारखान्यांमध्ये पाठविण्यात आले.
पूरबाधित महाड मधील दादली, कोथेरी,शिरगाव, कोल, कोलबौद्धवाडी, वडवली, चोचिंदे, कोंडीवते, बौद्धवाडी, राजेवाडी, काळींज, खरवली, आदिवासीवाडी काळींज, बिरवाडी, आकले, आसनपोई, कांबळे तर्फे महाड, नडगाव तर्फे बिरवाडी, आमशेत अशा 18 गावांमध्ये प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली.
रायगड जिल्हा परिषद, महाड पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्केप महाड, रूरल अँड यंग फाऊंडेशन या संस्थांच्या नियोजनाने संस्था व नेहरू युवा केंद्राच्या 50 स्वयंसेवकांनी दिवसभरात 2 टन प्लास्टिक व बॉटल असा कचरा पंचायत आणि संस्थेच्या गाड्यांनी सिस्केप संस्थेच्या संकलन केंद्रावर संकलित केला. जमा केलेल्या प्लास्टिकचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक पुर्ननिर्माण प्रक्रियेसाठी कारखान्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.
या अभियानासाठी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, महाड गटविकास अधिकारी वृषाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, सुरेश पाटील, गणेश खातू, सागर मेस्त्री, सुशील साईकर यांनी विशेष प्रयत्न केले.

00000