पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक

चंदीगड येथे शाखा उडण्यासाठी कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून एकाने प्रसिद्ध पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांना गंडा घातला आहे.

फसवणुकीचं प्रकरण आलं समोर..

▪️ रोहितकुमार शर्मा नामक व्यक्तीने पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे फिर्यादी गाडगीळ यांचा विश्वास संपादन करुन कर्ज वितरणासाठी व कर्ज प्रक्रिया शुल्क म्हणून एकूण 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपये घेतले.

▪️ चंदीगड येथे शाखा उघडण्यासाठी स्वत:ला व्यापार करण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन दिले.

▪️ हा प्रकार पुण्यातील लक्ष्मी रोडवरील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या दुकानात ऑक्टोबर 2018 ते 4 फेब्रुवारी 2019 या दरम्यान घडला आहे.  पण कोणतेही कर्ज मिळवून न देता घेतलेली रक्कम परत न देता फिर्यादी व त्यांच्या कंपनीची फसवणूक केली आहे.

पैसे देऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही कर्जाची प्रक्रिया किंवा पैसे मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गाडगीळ यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here