
मुंबई – पावसाने झोडपलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एक धोक्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. राज्यातल्या अनेक भागात पुन्हा एकदा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला विजांचा कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय. आधीच गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवलाय. त्यात थोड्या वेळापूर्वी हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजाने साऱ्यांची चिंता वाढवलीय.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. यात ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताय. दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि गोव्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यताय. या ठिकाणी जोरदार वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. या काळात ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताय.
अहिल्यानगर, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जळगाव आणि नाशिकला आज २२ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यात आज काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताय. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याला उद्या २३ सप्टेंबर आणि परवा २४ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, नाशिकला उद्या २३ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात या ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
मुंबई, ठाण्यातही बरसात
पालघर, ठाणे, मुंबईला जिल्ह्याला २२, २३ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला २२, २३, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलाय. तर रत्नागिरी जिल्ह्याला २२ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलाय. या काळात या ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला २३ आणि २६ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आलाय. धुळे, नंदुरबार जिल्ह्याला २२ आणि २३ सप्टेंबर रोजी, तर जळगाव-नाशिकला २३ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्याला २३ आणि २४ सप्टेंबर, पुणे जिल्ह्याला २२, २३, २४ आणि २५ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्याचा घाट भागात २२ ते २६ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे.
प. महाराष्ट्र आणि मराठवाडा
कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला २२ आणि २३ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर घाट कोल्हापूर, घाट साताऱ्याला २३, २३ आणि २५, २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्याला २२, २३, २४, २५ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला २३, २४ सप्टेंबर आणि जालना जिल्ह्याला २२, २३, २४ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्याला २२, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी तर बीड जिल्ह्याला २३, २४ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्याला २२, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याला २३, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला २२ ते २६ सप्टेंबरच्या दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे.





