पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस
पुण्यात 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस आला आहे.
वारजेतील रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीतला हा घोटाळा उघड झाला आहे.
सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मिळून मूळ सभासदांच्या हक्काच्या सदनिका भलत्याच लोकांना विकून ही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.




