आमदार अनिल भोसले यांच्या गाड्यांव्यतिरिक्त त्यांच्या किमती वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यावर जप्तीची कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्या दोन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी आमदार भोसलेंवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याबाबत भोसलेंच्या घरावर जप्ती आणण्यात आली आहे
सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीला जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. आमदार अनिल भोसले यांच्या गाड्यांव्यतिरिक्त त्यांच्या किमती वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आणखी काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात पुणे जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे.





