पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात कसबा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी मध्यरात्री हल्ला केला होता. दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुण्यातील बुधवार पेठेतील गवळी आळीसारख्या शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दीपक हे शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. विजय मारटकर हे शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा बुधवार पेठ भागातून नगरसेवकपदी निवडून आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विजय मारटकरांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे मारटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकं काय झालं? दीपक मारटकर काल रात्री जेवणानंतर बाहेर आले. आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारटकरांचे डोळे, डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करुन हल्लेखोर बाईकवरुन पसार झाले. दीपक मारटकर यांना उपचारासाठी पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता, तसेच बाईकला नंबर प्लेट नव्हती. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज शोधून असून अधिक तपास करत आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
नगर जिल्ह्यातील ८ गुन्ह्यातील ९ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई
नगर जिल्ह्यातील ८ गुन्ह्यातील ९ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद ; एलसीबीची कारवाई
अहमदनगर – जिल्ह्यातील...
“लोकसंख्या हा केवळ निकष नसावा”: सीमांकनावर हिमंता बिस्वा सरमा
गुवाहाटी: लोकसंख्या हा मतदारसंघाच्या सीमांकनाचा एकमेव आधार नसावा, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज सांगितले,...
राज्यात रात्रीची संचारबंदी? पुन्हा नवे निर्बंध लागू होणार..?
महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. महाराष्ट्रासह देशात वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या...
Milk price : प्रांत कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन
Milk price : संगमनेर : दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी...




