पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात कसबा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी मध्यरात्री हल्ला केला होता. दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुण्यातील बुधवार पेठेतील गवळी आळीसारख्या शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दीपक हे शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. विजय मारटकर हे शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा बुधवार पेठ भागातून नगरसेवकपदी निवडून आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विजय मारटकरांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे मारटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकं काय झालं? दीपक मारटकर काल रात्री जेवणानंतर बाहेर आले. आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारटकरांचे डोळे, डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करुन हल्लेखोर बाईकवरुन पसार झाले. दीपक मारटकर यांना उपचारासाठी पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता, तसेच बाईकला नंबर प्लेट नव्हती. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज शोधून असून अधिक तपास करत आहेत.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
चक्रीवादळ बिपरजॉय: वादळाच्या विलंबानंतर मान्सूनचा पाऊस ४८ तासांत सुरू होऊ शकतो
तीव्र वादळामुळे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या हवामानाच्या घटनेला विलंब झाल्यानंतर भारतातील मान्सूनचा पाऊस ४८ तासांत सुरू होण्याची शक्यता आहे.
महात्मा फुलेंचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते -सुशांत म्हस्के, ...
महात्मा फुलेंचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते -सुशांत म्हस्केआरपीआयच्या वतीने महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी...
अहमदनगर शहर व उपनगर भागास पाणी पुरवठा बंद, जाणुन घ्या संपूर्ण माहिती
अहमदनगर - विज वितरण कंपनी कडुननगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.४५ ते ६.०० या वेळेत खंडीत झाल्याने...
Omicron Variant: ओमायक्रॉनच्या नवीन लक्षणामुळं चिंता वाढली, बरं झाल्यानंतरही होतोय त्रास
Omicron Variant: कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉननं जगभरात जाळ पसरलय. दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सर्वात धोकादायक मानल्या जाणार्या डेल्टा...