पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या गतीला कोरोना आणि लॉकडाउनचा बसला फटका

    881

    पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या गतीला कोरोना आणि लॉकडाउनचा बसला फटका

    पुणे – शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या गतीला कोरोना आणि लॉकडाउनचा फटका बसला असल्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत मेट्रोच्या कामाने वेग घेतला, तर डिसेंबर २०२२ पर्यंत मेट्रो पुण्यात धावण्याचे नागरिकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
    हा प्रकल्प डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल, असे सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. वनाज- रामवाडी हा १४. ६५ किलोमीटरचा मार्ग संपूर्णतः एलिव्हेटेड पद्धतीने (रस्त्यावर खांब उभारून) होणार आहे. तर, पिंपरी-स्वारगेट १६ किलोमीटरच्या मार्गावर सुमारे ५ किलोमीटरचे अंतर भुयारी आहे. गेल्या तीन वर्षांत प्रकल्पाचे एकूण सुमारे ४० टक्के काम झाले आहे. तर, पुढील दोन वर्षांत ६० टक्के काम पूर्ण करण्याचे मेट्रो पुढे आव्हान आहे.

    कोरोनामुळे लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात एप्रिल ते मे दरम्यान मेट्रोचे काम ३५ दिवस बंद होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू झाल्या. त्यामुळे मेट्रोमध्ये काम करणाऱ्या ५ हजार कामगारांपैकी फक्त ८०० जण पुण्यात राहिले होते. सध्या परिस्थितीत सुधारणा झाली असून सुमारे ३८०० मजूर कार्यरत आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम क्षमतेच्या सुमारे ६०-७० टक्केच सुरू आहे.

    अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठांची मनमानी थांबवा; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

    मेट्रोचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत विचारणा केली होती. त्यावेळी पिंपरी – फुगेवाडी मार्गाचे काम डिसेंबरअखेरीस तर, आनंदनगर- गरवारे महाविद्यालयाचे काम पुढील वर्षी मार्चअखेरीस पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन महामेट्रोने दिले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here