पुण्यात यावेळी कोरोना महामारीमुळे पालिकेनं नागरिकांना नदी पाञात विसर्जनाला बंदी घातली आहे. तरीही काही लोक नजर चुकवून थेट नदी पाञातच मूर्ती विसर्जन करताना दिसत आहेत.
राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे गणेशोत्सवावरही संकट ओढावलं आहे. शनिवारी लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालं. अशात आज दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह, पुण्यात भाविकांची लगबग पाहायला मिळाते. पुण्यात यावेळी कोरोना महामारीमुळे पालिकेनं नागरिकांना नदी पाञात विसर्जनाला बंदी घातली आहे. तरीही काही लोक नजर चुकवून थेट नदी पाञातच मूर्ती विसर्जन करताना दिसत आहेत.
याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. खरंतर दरवर्षी नदीपाञात पालिकेच्यावतीने विसर्जन हौद बांधले जातात. पण यंदा ती पण सोय नसल्याने नागरिकांना हे असं नदीपाञात विसर्जन करावं लागतं आहे.
दुसरीकडे दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पुणे मनपाने 30 फिरते हौद तयार केले असून ते साडे दहा वाजता रस्त्यावर उतरले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. त्यांच्याच हस्ते या फिरत्या हौदांचं पूजन झालं आणि ते हौद विसर्जनासाठी बाहेर पडले.
दरम्यान, पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनी त्यांनी नागरिकांना केले आहे.
गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी काय आहे देशातील कोरोनाची स्थिती, वाचा आजची आकडेवारी
श्री गणेश आगमन-विसर्जनासाठी असणार असे नियम
आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये
आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी नागरीकांची उपस्थिती असावी
श्री गणेश प्रतिष्ठापना आणि उत्तर पूजा करताना घ्या काळजी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी
अनन्यसाधारण परिस्थितीत मनपाच्या नियम व अटींचे पालन करुनच छोट्या मंडपांना परवानगी
सार्वजनिक मंडळांसाठी श्रींच्या मूर्तीची मूर्तीची उंची चार फुट व घरगुती गणपतीसाठी दोन फुट असावी
कोरोनाही मोडू शकला नाही दगडूशेठ बाप्पाची 34 वर्षांची परंपरा, असा झाला कार्यक्रम
श्री गणेश पूजा करताना असतील असे नियम
आरती व पुजेसाठी 5 व्यक्तींचे बंधन, बाहेरील व्यक्तींचा सहभाग असू नये
सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसींग अनिवार्य
गणेश दर्शन ऑनलाइनच!
दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदी माध्यमांचा वापर करावा
ऑनलाईन व्यवस्था नसल्यास छोटे व्हिडीओ बनवून पाठवावेत
दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास द्यावा व सामाजिक अंतराचे पालन करावे कोणत्याही निमंत्रीत किंवा व्हिआयपी व्यक्तींना दर्शनासाठी आमंत्रीत करू नये







