पुण्यात आजपासून कलम 144 लागू; उल्लंघन केल्यास कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून (ता. 10) जमावबंदीचा आदेश लागू असेल, तर 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कलम 144 लागू करण्यात येईल. दरम्यान, याबाबतचे आदेश नुकतेच पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी जारी केले आहेत.