अहमदनगर टीम,5 ऑक्टोबर 2020 :- पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावातील अपहरण झालेल्या मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर यामधील आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, शनिवारी (दि.03) रोजी पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे येथील राहणारी मुलगी तिच्या भावासोबत पुण्याहून घरी येत असताना दिवे घाटात असताना स्वीप्ट गाडीतून आलेल्या चार तरुणांनी कोयत्याचा धाक दाखवत या मुलीचे अपहरण केले होते. अज्ञातांनी पळविलेल्या त्यामुलीला शोधण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनासमोर येऊन पडली होती.
आज अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथुन मुलीला व तिला पळवून नेणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे.