स्फोट हा संबंधित मृताच्या नातेवाइकांच्या हलगर्जीपणानेच ‘महापालिकेच्या विद्युत विभागाने सादर केला अहवाल१० ते १२ जण काही प्रमाणात भाजल्याची घटना
पुणे : ‘कैलास स्मशानभूमीत अंत्यविधीप्रसंगी पेट्रोलमुळे झालेला स्फोट हा संबंधित मृताच्या नातेवाइकांच्या हलगर्जीपणानेच झाला आहे. यामध्ये महापालिका सेवकांचा काहीही दोष नाही,’ असा अहवाल महापालिकेच्या विद्युत विभागाने सादर केला आहे.
दरम्यान, शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये अग्निरोधक यंत्रणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे. (Pune News Updates)
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असताना पेट्रोलचा भडका उडून मृताचे नातेवाइक भाजल्याचा प्रकार शनिवारी घडला होता.
यामध्ये १० ते १२ जण काही प्रमाणात भाजले. त्यातील काहींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
त्यांनी या घटनेबाबत सविस्तर अहवाल अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.