पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी आत्महत्यापुण्यात पोलीस दलात धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. शिल्पा चव्हाण असे या महिला पोलिसांचे नाव होते.
आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात आणि पुणे पोलीस दलात एकाच खळबळ उडाली आहे.
शिल्पा चव्हाण या सध्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी होत्या. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर येथे त्या राहत होत्या. राहत्या घरीच काल सकाळी त्यांनी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.
त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रांचचे काम त्या पाहत होत्या.
आज सकाळी त्यांच्या कार्यलयात कर्मचारी त्यांना आणण्यासाठी घरी गेला. त्याने त्यांना बराचवेळ फोन लावला, पण त्या फोन उचलत नव्हत्या.
त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने दरवाजा तोडला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा ताबडतोब वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अद्याप या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपस करत आहेत.शिल्पा चव्हाण या एक संयमी पोलीस अधिकारी होत्या असे त्यांच्याबाबत सांगण्यात येत आहे.
त्यांना एक मुलगा आहे जो गावी गेला होता. त्या आज घरी एकट्याच असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.