पुणे विभागातील 18 लाख 30 हजार 441 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

625

पुणे विभागातील 18 लाख 30 हजार 441 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

                                           विभागात कोरोना बाधित  19 लाख 893 रुग्ण

                                                                   -विभागीय आयुक्त सौरभ राव



   पुणे, दि. 16 : पुणे विभागातील 18 लाख 30 हजार 441  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 893 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 314 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 39  हजार 138 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.29 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

        पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 98 हजार 947 रुग्णांपैकी 10 लाख 71 हजार 987 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 572 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 388 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.55 टक्के आहे.

सातारा जिल्हा

          सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 30 हजार 229 रुग्णांपैकी 2 लाख 16 हजार 150 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 487 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

          सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 85 हजार 658 रुग्णांपैकी 1 लाख 75 हजार 861 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 120 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 677 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

           सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 85 हजार 61 रुग्णांपैकी 1 लाख 74 हजार 441 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 757 आहेत.  कोरोनाबाधित एकूण 4 हजार 863 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

        कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 998  रुग्णांपैकी 1  लाख 92 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 378 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 749 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 787, सातारा जिल्ह्यात 653, सोलापूर जिल्ह्यात 582, सांगली जिल्ह्यात 460 तर कोल्हापूर जिल्ह्यात 267 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 919 आहे. पुणे जिल्हयामध्ये 375, सातारा जिल्हयामध्ये 629, सोलापूर जिल्हयामध्ये 502, सांगली जिल्हयामध्ये 605 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 808 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 40 लाख 76 हजार 858 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 893 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here