पुणे विद्यापीठ देणार डिजिटल “शेती’ला प्रोत्साहन

पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नव्या तंत्रज्ञानासह “डिजिटल शेती’ या विषयावरील “उत्कृष्टता केंद्र’ सुरू करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्सला नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण होणार आहे.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि आयडियालॅब्स फ्युचरटेक व्हेंचर्सचे संस्थापक पंकज दिवाण यांनी सोमवारी (दि. 26) याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, मिलिंद कांबळे उपस्थित होते. या केंद्रामार्फत डिजिटल शेती या विषयावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सला मार्गदर्शन केले जाणार आहे. यात डिजिटल प्रयोगशाळा आणि मेकर स्पेसचा समावेश असेल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनक्‍युबेशन सेंटरने नवनवीन संशोधन करण्याकरिता शेतीवर लक्ष केंद्रित केले आहे. आयडिया लॅब्स यांच्या सहकार्याने शेती क्षेत्रात पुणे विद्यापीठ नक्कीच उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्‍वास आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here