
पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन पुतळ्यावर थेट हल्ला चढवला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास हातात धारदार कोयता घेऊन केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला एक तरुण रेल्वे स्थानकाच्या बाहेर आला. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन तो चौथऱ्यावर चढला आणि पुतळ्यावर कोयत्याने वार करू लागला.






