पुणे रिंग रोड : पूर्व भागातील भूसंपादनाला मिळणार गती; 293 हेक्टर साठी 2,000 कोटी मंजूर, ‘त्या’ 48 गावात सुरु होणार भूसंपादन

    174

    Pune Ring Road : विद्यच माहरघर पुणे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते. म्हणून या शहराला राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे. अलीकडे मात्र राज्याची सांस्कृतिक राजधानी वाहतूक कोंडीसाठी विशेष ओळखली जात आहे. शहरात एक-दोन किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तरी देखील निवांत घराबाहेर पडावे लागते.

    दोन-तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी सुद्धा काही प्रसंगी एखादा तास खर्च करावा लागतो. फक्त पुण्यालाच वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे असे नाही तर पुणे लगत असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील जनतेला वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड ^ शहराबाहेर रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे.

    हा रिंग रोड राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. सध्या या रिंग रोड साठीच्या भूसंपादनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. भूसंपादन पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे. हा रिंग रोड एकूण दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पूर्व रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड अशा दोन भागात या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. सध्या स्थितीला पश्चिम भागातील रिंग रोडसाठीचे भूसंपादन सुरू आहे.

    हाती आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत पश्चिम भागातील 205 हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. आणखी 411 हेक्टर जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे या जमिनीसाठी सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. सक्तीने भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देखील मिळालेली आहे.

    पश्चिम रिंग रोडसाठीच्या जमिनीच्या मोबदल्या पोटी आतापर्यंत 1021 कोटी रुपयांचा निधी संबंधित जमिनी धारकांना मिळालेला आहे. अशातच आता पुणे रिंग रोडच्या पूर्व भागासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पूर्व रिंग रोड साठी 293 हेक्टर क्षत्राचे संपादन केले जाणार असून यासाठी तब्बल 2 हजार 89 कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

    यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे निधीची मागणी देखील केली आहे.विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी भूसंपादनासाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली आहे. यामुळे पूर्व भागातील रिंग रोडच्या भूसंपादनाला देखील लवकरच सुरुवात होणार असा आशावाद व्यक्त होत ਪਸ ਦੇ ਅਧੀਕ ਸਰੀਰ ਕਰਨਗਰ असून हे भूसंपादन देखील लवकरात लवकर पूर्ण होईल असे सांगितले जात आहे.

    खरतर, पूर्व भागातील रिंग रोडमध्ये बाधित होणाऱ्या 13 पैकी 12 गावांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. यामुळे, आता लवकरच पूर्व भागातील रिंग रोड साठी भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. भूसंपादनाची सुरुवात खेड तालुक्यापासून करण्यात येणार असे सांगितले जात आहे. त्याकरिता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना भूसंपादन नोटिसा देखील पाठविण्यात आल्या आहेत.

    पूर्व भागातील मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15 आणि पुरंदर तालुक्यातील 7 आणि भोरमधील 9 अशा 48 गावांमध्ये हा रिंग रोड विकसित होणार आहे. आता या 48 गावांमध्ये शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर येत्या काही दिवसात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here