पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक-2021 प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्द

765

पुणे दि. 16 :- नगरविकास विभागाकडील सूचनेनुसार पुणे महानगर नियोजन समितीवर थेट निवडणूकीद्वारे नामनिर्देशित होणा-या 30 सदस्यांची नेमणूक करावयाची आहे. या निवडणूकीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील ग्रामीण निर्वाचन क्षेत्र (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) व मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) क्षेत्रातील नामनिर्देशित सदस्यांच्या मतदार यादी तयार करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2021 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.
पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक-2021 ची प्रारुप मतदार यादी उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी विभागीय आयुक्त यांचे कार्यालय तसेच वेबसाईट www.divcommpune.in वर, जिल्हाधिकारी कार्यालय, आुयक्त महानगरपालिका, पिंपरी चिंचवड कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचेशी संबंधित कार्यालये, मुख्याधिकारी लोणावळा, तळेगांव, शिरुर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, सासवड नगरपरिषद आदी कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
यादीत समाविष्ट असलेल्या मतदारास दिनांक 17 ते 20 ऑगस्ट 2021 या तीन दिवसांच्या आत कोणीही आक्षेप, उणीवा किंवा चुका विभागीय आयुक्त, पुणे विभाग पुणे, विधानभवन, पुणे-1 यांचेकडे लेखी स्वरुपात सुट्टीचा दिवस वगळून प्रत्यक्षरित्या किंवा pmpcelection2021@gmail.com या ईमेल आयडीवर दाखल करता येतील.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here