
राज्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र बघायला माळले आहे. पिक विमा भरण्याची मुदत संपायला आली तरी राज्यात केवळ 20 ते 22% शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे.
तर परभणीत मी पिक विमा भरणार नाही अशी चळवळच शेतकऱ्यांनी चालू केली आहे.
राज्य सरकारने दोन वर्ष एक रुपयात पिक विमा देण्याची योजना सुरू ठेवल्यानंतर यावर्षी सरकारनं ही योजना बंद करून नव्याने पंतप्रधान पीक विमा योजना आणली.
मात्र ज्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. पीक विमा भरण्याची मुदत संपत आली तरीही केवळ राज्यात 1 कोटी 27 लाख 39 हजार 257 हेक्टर पैकी केवळ 36 लाख 54 हजार हेक्टर एवढ्याच क्षेत्राचा विमा 29 जुलै पर्यंत काढण्यात आला आहे.
म्हणजेच ज्याची टक्केवारी 20 ते 22 टक्के एवढ्या शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार, शासनाने या योजनेत अनेक बदल केल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.