पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 कोटींचे ड्रग्स जप्त केल्याने खळबळ

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींंचं ड्रग्स जप्त, पाच आरोपी अटकेत ड्रग्स कनेक्शन मागे मोठी टोळी असल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत. आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊ आणि मग त्या चौकशीत याचा छडा लावला जाईल, असा पोलीस आयुक्तांनी दावा केलाय. हे ड्रग्स कुठून आणि कशासाठी आणलं गेलं याबाबत आता विविध तर्क लावले जातायेत. बॉलिवूडचे लक्षही याकडे लागून राहिलंय. कारण पिंपरी चिंचवडमध्ये सापडलेल्या मेफेड्रॉन ड्रग्सचं बॉलिवूडपर्यंत कनेक्शन आहे का? आणि हे ड्रग्स कुठून, कसं आणि कोणासाठी इथं आणलं होतं? तसेच अन्य कोणत्या शक्यता यामागे आहेत या सर्वांचा छडा लावून याच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे आयर्नमॅन म्हणून ओळखल्या जाणारे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केलंय. खबऱ्याच्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलिसांनी खेड तालुक्यात सापळा रचला. तेव्हा चाकण-शिक्रापूर रस्त्यावर एक चारचाकी आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी धूम ठोकली अन पोलिसांनी पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. गाडीची झडती घेतली असता पाच आरोपींकडून त्यात 20 कोटींचे 20 किलो मेफोड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आलं. बेड्या ठोकलेल्या पाच आरोपींपैकी दोघे झारखंड आणि बिहारचे आहेत. पण सध्या ते नोएडामध्ये फार्मा डिस्ट्रिब्युटरचे काम करतात. तर अटकेत असलेले पुण्याच्या शिरूरमधील तिघांच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कुटुंबीय ही चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. या ड्रग्स कनेक्शन मागे मोठी टोळी असल्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांचा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करणार आहेत. आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊ आणि मग त्या चौकशीत याचा छडा लावला जाईल, असा पोलीस आयुक्तांनी दावा केलाय. एनसीबीच्या तपासात बॉलिवूडमधील मोठे मासे अडकलेत. त्यातच पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्सचे बॉलिवूड कनेक्शनची शक्यता आहे. त्यामुळे बॉलिवूडचं लक्ष या कारवाईकडे लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here