पावसाळ्यानंतर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार
शहरातील विविध भागातून जाणारे 39 रस्ते डांबरीकरण केले जाणार.
औरंगाबाद महापालिका प्रशासनाने पावसाळ्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत आठ ते दहा दिवसांमध्ये निविदा मागविण्यात येणार असून या कामाची किंमत 57 कोटी रुपये असणार आहे.
?? महापालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी रस्त्यांसाठी 100 कोटींची तरतूद केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 57 कोटी रुपयांचे रस्त्याचे कामे केली जाणार आहे.
??’57’ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या विकासासाठी निविदा देण्याची फाइल मंजुरीसाठी पाठवली आहे. 8-10 दिवसात निविदा मिळेल, आणि संपूर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर रस्ता बांधणी सुरू केली जाईल. त्याचबरोबर 39 रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू केले जाणार आहे.’ असे शहर अभियंता एस.डी. पानझाडे यांनी सांगितले.