पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते विभागीय आयुक्तालयात मुख्य ध्वजारोहण  ऑनलाईन स्वरुपातून होणार प्रक्षेपण

436

औरंगाबाद, दि.13 (जिमाका) – उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा तथा पालममंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन नागरिकांना घरबसल्या पाहता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/AurangabadDIO या फेसबुक पेज, तसेच MCN या स्थानिक वाहिनीच्या (चॅनल क्र.122 व 523 (एचडी)) व युट्यूबवर MCN NEWS चॅनेलवरुन थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास निमंत्रितांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, मास्क परिधान करुन कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here