पारशाहखुंट येथे सोमवारी रात्री सलूनच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.हे हाणामारीत ३० आरोपी

1325

रविवारी सकाळी सेंट्रल हेअर कटिंग सलून या कटिंगचे दुकानात कटिंग साठीचे नंबर वरून इरफान गफार शेख व ओमकार हरबा यांचेत वाद झाले. झालेले वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटाचे लोक एकत्र आले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्याने दोन्ही बाजूच्या जमावाने एकमेकांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अंधाधुंद दगडफेक केली

दगडफेकीमध्ये कौशल अशोक काटकर व राजू गफुर शेख असे जखमी झाले आहेत. ओमिनी (एम एच 16, बी एच 5179) चे दगड फेकीत नुकसान झाले आहे. परिसरामधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने भयभीत होऊन व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून घेतली.

किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीला जातीय रंग चढू नये याची खबरदारी घेत पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

सलूनच्या दुकानात नंबर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेकीत चौघे जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली असली तरी तणावाचे वातावरण कायम आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील पारशाहखुंट येथे सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी धरपकड सुरू करत सात जणांना अटक केली आहे. पोलिसात फिर्याद देण्यापासून दोन्ही गटांनी पळ काढल्याने पोलिस स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे.

भा.द.वि. कलम 307, 336,338,143,147,148,149,188,427 सह क्रिमिनाल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम कलम 7(1)(अ)प्रमाणे राजु गफुर शेख ( रा.हातमपुरा), हर्षद हमीद पिंजारी (रा. पिंजार गल्ली), सुलतान नन्नाखान पठाण, गौसीम गुलाम शेख, इरफान गफार शेख, रईस पिंजारी, सलमान शेख, शाहिद शेख, नवाज शेख, तनवीर शेख, बाबा शेख, अरबाज शेख, कौशल अशोक काटकर ( सर्व रा.हातमपुरा अहमदनगर), सतीश हरबा, ओमकार हरबा, योगेश हरबा, सुधीर हरबा, लंकेश हरबा (सर्व रा. सतरंजी मस्जिद जवळ अहमदनगर) व इतर दहा ते बारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र प्रभाकर गर्गे यांनी फिर्याद दिली आहे.

रविवारी सकाळी सेंट्रल हेअर कटिंग सलून या कटिंगचे दुकानात कटिंग साठीचे नंबर वरून इरफान गफार शेख व ओमकार हरबा यांचेत वाद झाले. झालेले वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटाचे लोक एकत्र आले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्याने दोन्ही बाजूच्या जमावाने एकमेकांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने अंधाधुंद दगडफेक केली

दगडफेकीमध्ये कौशल अशोक काटकर व राजू गफुर शेख असे जखमी झाले आहेत. ओमिनी (एम एच 16, बी एच 5179) चे दगड फेकीत नुकसान झाले आहे. परिसरामधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने भयभीत होऊन व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून घेतली.

किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीला जातीय रंग चढू नये याची खबरदारी घेत पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. घटनास्थळ परिसरात फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंग करिता बंदोबस्त नेमण्यात आला असला तरी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here