पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडळ अधिकारी यांनी देवरे यांच्या विरोधात केलें बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

662

.

अहमदनगर (प्रतिनिधी)-

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिले. मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या हाताखालील कर्मचारीच आता देवरे यांच्या विरोधात उभे राहीले आहेत.

पारनेर तालुका महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटना तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना तसेच मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही मागणीचे निवेदन दिले होते. या निवेदनातून तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वांच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा अशी मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण होत नसल्याने पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकाऱ्यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांचे महिला विषयी आणि सर्व कर्मचारी वर्ग विषयीचे दडपशाहीचे धोरण चुकीचे कामे करण्याचा दबाव टाकण्याची कार्यपद्धती नियोजन शून्य कारभारामुळे तसेच राजकीय दृष्ट्या सक्रिय होऊन कारभार करणे अशा अनेक बाबींमुळे सर्व कर्मचारी वर्ग त्यांचे कारभारास वैतागलेले आहेत तहसीलदार ज्योती देवरे कर्मचाऱ्यांना सूड भावनेची वागणूक देतात त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दडपशाही विरोधात महसूल सहाय्यक आणि तलाठी कर्मचारी संघटना पारनेर यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन पारनेर तहसील कार्यालयाच्या समोर करण्यात आले.

यावेळी महेंद्र रोकडे, एस.यु. मांडगे, एम.आर.उडे, पी.बी.जगदाळे, डी.डी.पवार, एस. एस.गोरे, ए.ल निकाळजे, रविंद्र शिंदे, ए.एम गायकवाड, डी. यु चव्हाण, व्ही.व्ही वैराळकर, ए.के लांडे, एस.ई पवार, बी.एम कुसमुडे, डी.डी कदम, ए.बी मंडलिक आदीसह महसूल सहाय्यक व तलाठी कर्मचारी संघटना पारनेर चे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here