पारनेरच्या दुर्गम भागात बनावट नोटांची छपाई; आरोपी अटकेतपारनेर(प्रतिनिधी.)तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विकास सुरेश रोकडे (वय१९,वडगाव सावताळ, पारनेर) बनावट नोटांची छपाई करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात एटीएम मशीन फोडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.यातील आरोपी विकास रोकडे बनावट नोटा छापत असल्याचा पोलिसांना संशय होता.परंतु तो हा उद्योग नेमका कोठे करतो याबाबत स्पष्टता नव्हती.’एटीएम’ प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक एच.एन.उगले यांनी आरोपी रोकडे याच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ५०० व १०० रूपये दराच्या बनावट नोटा व बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग,छपाईचे यंत्र,विशीष्ट कागद,कात्री इत्यादी साहित्य आढळले.बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी पारनेर पोलिसांनी विकास रोकडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राडा?, शशिकांत शिंदे-ज्ञानदेव रांजणे समर्थकांमध्ये वादावादी
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा बँकेच्या 11 जागा बिनविरोध झाल्या असून 10 जागांसाठी मतदान होत आहे....
जिल्ह्यात अवैध गावठी हातभट्टी दारूअड्डे उध्वस्त,तीन आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल
अहमदनगर - 23 जानेवारी रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड आणि श्रीरामपुर शहरातील सूतगिरणी येथे गावठी...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किल्ले सिंहगडाला भेट देवून केली पाहणी
नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे...







