पारनेरच्या तहसिलदारांनी घेतली डॉ. गोऱ्हेंची भेट, ज्योती देवरे यांना सुरक्षा पुरविण्याच्या स्थानिक प्रशासनास सूचना!

पारनेरच्या तहसिलदारांनी घेतली डॉ. गोऱ्हेंची भेटज्योती देवरे यांना सुरक्षा पुरविण्याच्या स्थानिक प्रशासनास सूचना

नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी काही दिवसांपूर्वी ऑडिओच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाNयांकडून होत असलेल्या त्रासाबाबत वाचा फोडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून देवरे आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी सूचना त्यांनी नगरच्या स्थानिक प्रशासनाला केली आहे.यासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र देऊन महिला सचिवांमार्पâत चौकशी करण्याची सूचना केली होती. महिलांवरील अन्यायाच्या बाबतीत डॉ. गोऱ्हे या नेहमीच महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. त्याप्रमाणेच त्या ज्योती देवरे यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. या मदतीबद्दल श्रीमती देवरे यांनी शनिवारी रात्री उशीरा डॉ. गोऱ्हे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना नगर संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.छळणूक करण्याचा अधिकार नाहीयादरम्यान स्वत:ला होत असलेल्या त्रासाचा पाढा वाचताना श्रीमती देवरे भावुक झाल्या होत्या. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना धीर दिला. जर खरंच भ्रष्टाचाराच्या आरोपात कोणतेही तथ्य नसेल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कुणालाही कायद्याच्या नावे अधिकाऱ्यांना मारहाण – छळणूक करण्याचा अधिकार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी बजावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here