पाकिस्तान अमेरिकेला घाबरला! इराणला दिला गुलिगत धोका, हल्ले पाहून अचानक घेतला मोठा निर्णय!

    97

    अझरबैजान आणि तुर्की या देशांनंतर आता पाकिस्तानही इराणमधून काढता पाय घेत आहे. पाकिस्तानने तेहरानमधील आपल्या राजनयिक अधिकाऱ्यांना परत बोलावलं आहे. जे अधिकारी मोठे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी नाहीत, त्यांना पाकिस्तानने परत त्यांच्या मायदेशी बोलावलं आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

    अमेरिकेने काय घेतला निर्णय?

    इराण हा पाकिस्तानचा शेजारी दे श आहे. पाकिस्तान आणि इराण यांच्यातील सीमा तब्बल 909 किलोमीटर आहे. अमेरिकेच्या या नव्या निर्णयाबाबत एक्स्प्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सध्या इराणच्या तेहरान शहरावर होत असलेल्या हल्ल्यांना लक्षात घेऊन आपल्या राजनीयक अधिकाऱ्यांना परत पाकिस्तानमध्ये बोलावले आहे. सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जातंय.

    इराणचं केलं होतं समर्थन इराणवर होत असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यांवर पाकिस्तानने आक्षेप व्यक्त केला होता. या देशाने इराणला पाठिंबा दिला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील इराणी दूतावासाला भेट देत आम्ही इराणच्या पाठीशी आहोत, असं सांगितलं होतं. अलिकडेच एकूण 21 देशांनी इस्रायलविरोधी भूमिका घेत एक नवेदन जारी केले होते. या देशांत पाकिस्तानचाही समावेश होता. या निवेदनात इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला होता. तसेच हे हल्ले रोखण्यात यावेत, अशी मागणी केली होती.

    पाकिस्तान भूमिका बदलत आहे का?दरम्यान, इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तान सध्य वेगळी भूमिका घेत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2025 सालातील मे महिन्यात भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, इराणने पाकिस्तानला वाचवण्यासाठी भारताशी चर्चा केली होती. तसेच पाकिस्तानमधील दूतावासातील अधिकाऱ्यांना परत बोलावलं नव्हतं. पण आता इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धादरम्यान मात्र पाकिस्तानने इराणमधील राजनयीक अधिकाऱ्यांना परत बोलावलं आहे.

    पाकिस्तानची हीच भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.पाकिस्तानच्या भूमिकेचा अर्थ काय?दरम्यान, अमेरिका या महासत्तेने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या विरोधात जायला नको म्हणून पाकिस्तानने ही भूमिका घेतली आहे असे बोलले जात आहे. इस्रायलकडून तेहरान शहरावर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे, असं म्हटलं जातंय. दरम्यान, आता पाकिस्तानच्या या निर्णयावर इराण नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here