पाकिस्तानची जागतिक पातळीवर पुन्हा नाचक्की

* क्रिकेटपटूचा पंतप्रधान बनलेले इमरान खान यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये सर्व विरोधी पक्ष एकवटले असताना, आता त्यातून धडा घेण्याऐवजी, खान यांचे सरकार सातत्याने जागतिक पातळीवर देशाची नाचक्की आणि फटफजिती करुन घेत आहे. ? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी इस्लामिक दहशतवादावर एक वक्तव्य केले होते. यावरून मुस्लिम राष्ट्रांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पाकिस्ताननेही संसदेत निषेध प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी आणखी एक प्रस्ताव देत म्हटले की, फ्रान्समधील पाकिस्तानी राजदूताला माघारी का बोलवू नये. ? पाकिस्तानच्या संसदेत या प्रस्तावावर बहुमताने संमती देण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक ए इन्साफ’सह विरोधी पक्षांना एकमुखाने प्रस्तावाला होकार दिला. ? मात्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनाच, आपल्या देशाचा फ्रान्समध्ये राजदूतच नाही, याची कल्पना नसल्याचे उघड झाले आहे. तीन महिन्यांपूर्वीचे तेथील राजदूताला, मोइन-उल-हक यांना पाकिस्तानने माघारी बोलावले होते. ? पाकिस्तान सरकारनेच त्यांची बदली करत चीनमधील राजदूत नियुक्त केले होते. सध्या मोहम्मद अजिज काझी हे पाकिस्तानच्या पॅरिस येथील दुतावासाचे उप प्रमुख आहेत. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर फटफजिती झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here