पहिल्यांदा बचत गट सुरु करतायं ? जाणून घ्या प्रक्रिया

445
  • पहिल्यांदा बचत गटाची सुरवात करायची असेल तर तो गट कसा तयार करायचा, त्याची सुरवात कशी करायची, त्याचा पाया कसा मजबूत करायचा, गटाची रचना कशी आहे, त्यातून कोणते व्यवसाय करता येईल, त्यातून फायदे कसे मिळतील…
  • *याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.*
  • *बचत गट स्थापन कसा करावा❓*
  • ▪️बचत गट स्थापन करण्यासाठी गरज असते विश्वास आणि सहकार्याची. बचतगट स्थापन करण्यासाठी समूहाचे पैसे गुंतवले जातात, गटातील लोकांचे प्रयत्न आणि प्रयत्नांचीही खूप अपेक्षा असते, त्यामुळे हे त्यांचे काम अगदी सुरुवातीपासूनच असावे.
  • *किती जण मिळून गटाची सुरवात करू शकतात❓*
  • ▪️बचत गटाची सुरवात करताना दहा ते बारा जण मिळून गटाची सुरवात करु शकतात.
  • *बचत गटाचा पाया कसा घट्ट होतो❓*
  • ▪️गटाचे नियम, अटी, रुपरेषा आणि त्यावर एकमत झाले की त्या गटाचा पाया घट्ट होऊ लागतो. यातूनच नव्या संकल्पनांवर एकमत करुन व्यवसायाला सुरवात करता येते.
  • *बचत गटाची रचना…*
  • ▪️ एकाच गावातील किंवा वस्तीतील काही महिलांनी एकत्र येवून बचत गटाची संकल्पना समजून घेणे
  • ▪️ बचत गटात शिक्षणाची कोणतीही अट नाही.
  • ▪️ महिला सभासदांची संख्या कमीतकमी सात ते आठ असावी. जास्त सभासद असल्यास अधिक चांगले.
  • ▪️ बचत गटाच्या महिलांनी मिटिंगसाठी कोठे एकत्र भेटायचे ते ठिकाण ठरवावे.
  • ▪️ सर्व संमतीने बचत गटाचे नाव ठरवावे.
  • ▪️ दर महिन्याला किती रक्कम जमा करावयाची हे ठरवावे.
  • ▪️ बचत गटाची नियमावली ठरवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here