राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त महाराष्ट्रात सीबीएसई, आयसीएई, आयबी अशा विविध बोर्डाच्या शाळा कार्यरत आहेत. या बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीला प्रवेश देताना, विद्यार्थ्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या तारखा ग्राह्य धरल्या जात होत्या. पूर्व प्राथमिकमध्येही प्रवेशासाठी वयाची निश्चित अशी अट नव्हती.प्ले ग्रुप, नर्सरी व पहिलीला प्रवेश देताना, विद्यार्थ्याचं नेमकं वय किती असावं, याबाबत मागील वर्षी शासनाने आदेश दिला होता. त्यानुसार, ३१ डिसेंबर ही तारीख ग्राह्य धरण्यात आली होती.. तोपर्यंत वयाची 6 वर्षे पूर्ण झाल्यास, पहिलीत प्रवेश मिळू शकेल, असे स्पष्ट केले होते. शिक्षण संचलनालयाने त्यावेळी ३० सप्टेंबर ऐवजी ३१ डिसेंबर अशी शिथिलता आणली. मात्र, त्यानंतरही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमधील जन्मलेल्या मुलांच्या पहिलीतील प्रवेशाबाबत अडचणी येऊ लागल्या…विद्यार्थ्यांच्या वयाबाबत स्पष्टीकरणसगळ्या बाेर्डामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी अखेर प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने पहिलीसाठी प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या वयाबाबत स्पष्टीकरण दिलेय.. शिक्षण संचलनालयाने पुन्हा एकदा परिपत्रक काढले आहे.. त्यानुसार, आता १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान जन्मलेल्या आणि वयाची ६ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश घेता येणार आहे.. राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात नर्सरी, पहिली प्रवेशांसाठी हा नियम लागू राहणार आहे.प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वय प्ले ग्रुप/ नर्सरी १ ऑक्टोबर २०१८- ३१ डिसेंबर २०१९ किमान वय ३ज्युनिअर केजी १ ऑक्टोबर २०१७- ३१ डिसेंबर २०१८ किमान वय ४सिनिअर केजी १ ऑक्टोबर २०१६- ३१ डिसेंबर २०१७ किमान वय ५पहिली १ ऑक्टोबर २०१५- ३१ डिसेंबर २०१६ किमान वय ६
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
अत्त्याचार केस मधील आरोपीस नेवासा कोर्टाकडून जामीन मंजूर
अत्त्याचार केस मधील आरोपीस नेवासा कोर्टाकडून जामीन मंजूर
प्रतिनिधी :
नेवासा : सोनई पोलीस स्टेशन येथे...
कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशन (आहार) तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या...
ठाणे, चंद्रपूर, अकोला येथे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ओळखले जाणारे डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हाधिकारीपदी रुजू
अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका): रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज सूत्रे स्वीकारली.
ज्वेलर्सवर दरोडा : अवघ्या तीन मिनिटांत शटर उचकटले अन् ५ मिनिटांत लुटले ४१३ ग्रॅम...
दीड वाजता रेकी; ४.३० वाजता चोरी, २४.६८ लाखांचा मुद्देमाल लंपास





