अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, खासगी रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये बेड शोधण्याची पाळी रुग्णांवर आली आहे. मध्यंतरी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत असल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यांच्या या मागणीला शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पवार यांनी जिल्ह्यासाठी इंजेक्शन्स पाठविले आहेत. ते गरीब रुग्णांना मोफत देण्यात येणार आहेत. नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी संग्राम जगताप यांनी शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सरकारने तत्काळ पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रेमडेसिवीरचा साठा नगरकरांसाठी पाठविला असून, तो गरजू रुग्णांना मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती संग्राम जगताप यांनी दिली. आमदार जगताप यांनी इंजेक्शन्सचा साठा शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या वेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे, वैभव ढाकणे, पराग झावरे, भूपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Drama : हाऊसफुल्ल… ‘नाना थोडं थांबा ना’
Drama | राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकाला (Drama) हाऊसफुल्लचा बोर्ड हे क्वचितच आपल्याला पहायला अथवा ऐकायला मिळते. शनिवारी (ता. २५) संध्याकाळी नगरच्या (Ahmednagar) रंगकर्मी...
AAP ने दिल्ली, हरियाणासाठी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले
नवी दिल्ली: काँग्रेससोबत जागावाटपाचा करार झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्ली आणि हरियाणामधील उमेदवारांची घोषणा...
बालगृहातून अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण
बालगृहातून अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण
नगर पुणे रोड वरील केडगाव उपनगरातील भूषण नगर येथील संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली...
कर्जत नगर पंचायत च्या उर्वरित चार प्रभागासाठी मतदान .
कर्जत नगर पंचायत च्या उर्वरित चार प्रभागासाठी काल दिनांक १८जानेवारी२०२२ रोजी ०७:३० ते ०५:३० पर्यंत ८७.०५ टक्के मतदान झाले . या चार...




