पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कास पठारावर पार्किंगची योग्य ती सुविधा व्हावी : खा. श्रीनिवास पाटील

503

सातारा दि. 26 (जिमाका) : जागतिक पर्यटन स्थळ असणाऱ्या कास पठारावर पर्यटनासाठी येणाऱ्या वयोवृध्द, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने पर्यटकांची वाहने सुरळीत पार्किंग करण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज खा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी कदम, पाचगणी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, मलकापूर नगर पंचायतीचे मनोहर शिंदे, निवासी उप जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोंगीलवार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक अस्मीता पाटील, वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, ऑटोमोबाईल डिलर संघटनेचे सचिन शेळके व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांनी, शिंदेवाडी फाटा येथील पुलाचे कामकाज त्वरीत सुरु करावे. महामार्गावरील गावांच्या नावाचे चुकीचे फलक दुरुस्त करावे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वेग मर्यादेचे फलक लावावे. वाहन चालवितांना वाहन धारकांना मोबाईलवर संभाषण करण्यास मज्जाव करणे प्रसंगी दंड आकरण्यात यावा. दुचाकी वाहन चालकांना हेल्मट सक्तीचे करण्यात यावे अशा सूचना त्यांनी शेवटी केल्या.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here