
पदमश्री डॉ. पोपटराव पवार यांचा 65 वा वाढदिवस शाळेतील चिमुकल्याबरोबर साधेपणाने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. कसल्याही प्रकारचा अनाठायी खर्च नाही, गाजावाजा नाही, हार-तुरे, फ्लेक्स बोर्ड, बॅनर नाहीत, केक नाही, फटाक्यांची अतिषबाजी नाही तर निसर्गाच्या सानिध्यात चिमुकल्यांच्या बरोबर त्यांच्या हट्टापायी साधेपणाने वाढदिवस साजरा केला.
यावेळी बोलताना त्यांनी चिमुकल्यांना पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. प्रत्येकाने एक वृक्ष लावून जन्मदिवस साजरा करा. वृक्ष मोठा होईपर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करा. तरच आपलं जीवन प्रदुषण मुक्त होईल व आपल्याला शुध्द हवा मोठ्या प्रमाणात मिळेल. तसेच प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी थोरा-मोठ्यांच्या पाया पडून, तसेच कसल्याही प्रकारे निसर्गाची हानी, प्रदूषण होऊ न देता पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा संदेश दिला, केकऐवजी फळे कापून वाढदिवस साजरा करत जा, असेही ते म्हणाले.
यावेळी मंगेश ठाणगे मेजर, संतोष बारकू ठाणगे, बना पादीर, बोरकर बंधू, लक्ष्मण पवार, कुशाबा ठाणगे, दिपक ठाणगे, कैलास खैरे, नंदकुमार झावरे, नीता सोनवणे, रावसाहेब चत्तर व शाळेतील मुले-मुली उपस्थित होते.



