पत्र्याच्या शेडमध्ये २ लाख ७६ हजार किमतीचा गुटखा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
आलिशान बंगल्यामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये केली होती गुटख्याची साठवणूक
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी यांची संयुक्त कारवाई
अहमदनगर – जामखेड तालुक्यातील धोत्री गावाच्या शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये २ लाख ७६ गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेल्या ठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील पोउपनि सोपान गोरे, सफौ मन्सूर सय्यद, पोहेकॉ विश्वास बेरड ,पोना लक्ष्मण खोकले, पोना शंकर चौधरी ,पोकॉ कमलेश पाथरुट, पोकॉ योगेश सातपुते, चापोहेकॉ संभाजी कोतकर, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोकॉ रुदय घोडके यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये धोत्री गावाच्या शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवला असल्याची उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग अण्णासाहेब जाधव व अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती , धोत्री गावाच्या शिवारात रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले (रा धोत्री) हा त्याच्या दोन मित्रासमावेत त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला तसेच शरीरास अपायकारक असलेला हिरा कंपनीचा सुंगधी तंबाखू मिश्रीत पानमसाला गुटख्याची चोरुन विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगून बसलेला आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने माहिती उपविभागीय पोलीस अधीकारी कर्जत विभाग यांना फोनद्वारे सांगितले.
पो.नि.श्री कटके यांनी मिळालेल्या माहिती नुसार खात्री करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाणे येथून सरकारी वाहनाने निघून बातमीतील ठिकाणी धोत्री गावाच्या शिवारात रामकिशन उर्फ बाबू उत्तम अडाले (रा .धोत्री) याचा घराशेजारी पत्र्याच्या शेड मध्ये पायी चालत जावून खात्री केली असता, तेथे एकूण तिनजण हे हिरा नावाचा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात साठवून ठेवल्याचे मिळून आले.
अचानक छापा टाकला असता तेथून एकजण पोलीस पथक आपल्याकडे येत असल्याची चाहूल लागल्याने पळून गेला. या ठिकाणी दोन बसलेल्या इसमास ताब्यात घेतले त्याचे नाव रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले (वय २६, रा . धोत्री ता . जामखेड जि. अहमदनगर), सचिन निवृत्ती गायकवाड (वय ३१ रा . जामखेड ता . जामखेड जि. अहमदनगर) असे असलेचे सांगितले. त्याना पळून गेलेल्याबाबत माहिती विचारली असता पळून गेलेले व्यक्ती ते कोण आहेत हे मला माहित नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले, परंतु अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता पळून गेलेल्या व्यक्तीची नावे संजय सुभाष जगताप (रा .वाणेवाडी ता . पाटोदा जि. बीड) असे असलेचे सांगितले .
बसल्या ठिकाणची झडती घेतली असता त्याचे कब्जात हिरा कंपनीचा गुटखा मिळुन गोण्यामध्ये भरून असलेल्या स्थितीत आढळलेला गुटखाएकूण २ लाख ७६ हजार रु .चा प्रमाणे व किमतीचे हिरा कंपनीचे संगधी तंबाखू मिश्रीत पानमसाला गुटखा रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले, सचिन निवृत्ती गायकवाड याचे कब्जात मिळून आला,तो अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ मन्सूर सय्यद यांनी पंचासमक्ष जप्त करुन अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ मन्सूर सय्यद यांनी जप्त मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेतले .
दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी १२.३० वा . सुमा. रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले हा त्याच्या धोत्री गावच्या शिवारात त्याच्या राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा मित्र सचिन निवृत्ती गायकवाड (वय ३१, रा . जामखेड ता.जामखेड जि. अहमदनगर ), संजय सुभाष जगताप (रा. वाणेवाडी ता . पाटोदा जिल्हा बीड) याचे समावेत धोत्री गावच्या शिवारात त्याच्या राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये हिरा कंपनीचा सुगंधी तंबाखु मिश्रीत पानमसाला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जा त बाळगतांना मिळूना आला व असा खाद्य पदार्थ हा मानवी शरीरास अपायकारक , मूर्च्छाकारक , नशाकारक किंवा अपथ्यकारक आहे असे माहित असतांना सुध्दा असा खादय पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे .
इसम नामे रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले, सचिन निवृत्ती गायकवाड, व संजय सुभाष जगताप (रा . वाणेवाडी ता .पाटोदा जि. बीड, फरार ) त्याचे विरुध्द पोकॉ सागर जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम १८८ , २७२ , २७३ , ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहे.






