पत्नीचा घटस्फोटाला नकार, संतापलेल्या पतीने कोर्टातच एका बुक्कीतच दात पाडला!

पत्नीचा घटस्फोटाला नकार, संतापलेल्या पतीने कोर्टातच एका बुक्कीतच दात पाडला

पत्नीचा पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्याने पतीने कोर्टात पत्नीवर हल्ला चढवलाय.

पुणे कौटुंबिक न्यायालयात ही घटना घडली आहे. पुणे, 1 डिसेंबर: शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात घटस्फोटाच्या कौंन्सलिंगदरम्यान किरकोळ वाद झाल्यानंतर पतीने पत्नीचे एका बुक्कीत दोन दात पाडून

त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय पती सचिन विकास पवार (Sachin Vikas Pawar) याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 30 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. नेमकं काय घडलं?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती-पत्नी असून त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे. त्याबाबतचा अर्ज त्यांनी कौटुंबिक न्यायालयात केला आहे.

त्याचे कौंन्सलिंग शनिवारी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातील कौटुंबिक न्यायालयाच्या कक्षात होते. त्यासाठी दोघेही आले होते.

यावेळी सचिन याने पत्नीला घटस्फोटाबाबत माहिती देऊन विनंती केली. परंतु, तक्रारदार यांनी त्यांना त्यांच्याप्रमाणे घटस्फोट घेण्यासाठी नकार दिला.एका बुक्कीत पाडला दातपत्नीने घटस्फोटास नकार दिल्याचा राग आल्याने त्याने पत्नीच्या तोंडावर जोरात एक बुक्का मारला.

यात त्यांच्या पत्नीचा एक दात पडला. तर, दुसरा एक दात अर्धा तुटून खाली पडला.

यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.गेल्या सोमवारी पुणे कौटुंबिक न्यायालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशन कक्षात खरंतर पती-पत्नीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न होतो, जोडप्याला समोरासमोर बसवून त्यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला जातो. कोणताही जोडपं घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयाप्रत पोहोचण्याआधी त्यांचं समुपदेशन करून शेकडो कुटुंबं वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होत असतो. समजा या सामंजस्य सेशन दरम्यान जोडप्यात समेट घडून आलाच नाहीतर मग ही केस पुढे घटस्फोटासाठी पुढे पाठवली जाते.कौटुंबिक न्यायालयात दररोज अशा शेकडो केसेस वर्षानुवर्षे चालत असतात.

त्यातूनच घटस्फोटाची प्रक्रिया पार पडत असते. पण काही समुपदेशनाच्या सेशनमध्ये परस्परांची उनीदुनी काढून भांडत बसतात. पण शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातलं हे जोडपं त्याच्या पलिकडे जाऊन पोहोचलं आणि पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्याने पतीदेवांनी रागाच्या भरातच भर कोर्टातच आपल्याच पत्नीचा एका बुक्कीत दात पाडलाय. त्यामुळे हा जोडप्यांमधील कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरलेत.एका बुक्कीत पाडला दातपत्नीने घटस्फोटास नकार दिल्याचा राग आल्याने त्याने पत्नीच्या तोंडावर जोरात एक बुक्का मारला. यात त्यांच्या पत्नीचा एक दात पडला. तर, दुसरा एक दात अर्धा तुटून खाली पडला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

या घटनेनंतर पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.गेल्या सोमवारी पुणे कौटुंबिक न्यायालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय.कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशन कक्षात खरंतर पती-पत्नीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न होतो, जोडप्याला समोरासमोर बसवून त्यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला जातो. कोणताही जोडपं घटस्फोटासारख्या टोकाच्या निर्णयाप्रत पोहोचण्याआधी त्यांचं समुपदेशन करून शेकडो कुटुंबं वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होत असतो. समजा या सामंजस्य सेशन दरम्यान जोडप्यात समेट घडून आलाच नाहीतर मग ही केस पुढे घटस्फोटासाठी पुढे पाठवली जाते.

कौटुंबिक न्यायालयात दररोज अशा शेकडो केसेस वर्षानुवर्षे चालत असतात. त्यातूनच घटस्फोटाची प्रक्रिया पार पडत असते. पण काही समुपदेशनाच्या सेशनमध्ये परस्परांची उनीदुनी काढून भांडत बसतात.

पण शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातलं हे जोडपं त्याच्या पलिकडे जाऊन पोहोचलं आणि पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्याने पतीदेवांनी रागाच्या भरातच भर कोर्टातच आपल्याच पत्नीचा एका बुक्कीत दात पाडलाय.

त्यामुळे हा जोडप्यांमधील कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here