पगार थकल्याने शिर्डीतील कंत्राटी कामगारांवर आली उपासमारीची वेळ

पगार थकल्याने शिर्डीतील कंत्राटी कामगारांवर आली उपासमारीची वेळ
देशातील श्रीमंत देवस्थानापैकी एक शिर्डी संस्थान आहे. मात्र येथील कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यापासून पगार थकवल्याने त्यांची उपासमार सुरु आहे. या कामगारांना

न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्याने राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. साईबाबांंच्या दरबारात राजकारण करणार्‍यांना बाबांनी आता दूर ठेवले पाहिजे, अशी खंत कामगार वर्तुळातून व्यक्त होत आहे.

साईबाबा संस्थानने चालू महिन्यासह तीन महिन्यांचा कंत्राटी कामगारांचे पगार थकवल्याने त्यांची उपासमारी सुरू आहे. दि.27 ऑक्टोंबर रोजी संस्थानच्या बैठकीत पगाराबाबत निर्णय घेण्यात घेण्यात येणार होता; मात्र सदरची बैठक रद्द झाल्याने पगाराची आस लावून बसलेल्या कामगारांचा अपेक्षाभंग झाला असून ज्या कामगारांमुळे संस्थान प्रशासनाचा कारभार चालतो त्याच कामगारांना पगारासाठी संस्थानला बैठका घ्याव्या लागतात, ही आश्चर्याची बाब असून याप्रश्नी संस्थानच्या कामगार संघटना गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here