पंतप्रधान मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला पण प्रतिसाद दिला नाही – संभाजीराजे
मुंबई | मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणा अपुऱ्या असल्याचं म्हणत खासदार संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला पण प्रतिसाद दिला नसल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मराठी आरक्षणावर आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान, राज्य सरकारने मोठ्या मनाने आर्थिक मदत मिळवून द्यायला हवी, अशी मागणीही संभाजीराजेंनी केली आहे.





