नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती पहाटेच्या सुमारास समोर आली. देशात बीटक्वाईनला अधिकृत मान्यता देत असल्याची घोषणा त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आली. हा मेसेज मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड झाल्यानंतर ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे समजले. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरून बिटकॉइनबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवर लक्ष्य करण्यात आले. अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावरून काही ट्वीट करण्यात आले. यामध्ये बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाउंट 12 डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते.अकाउंट हॅक करण्यात आल्यानंतर करण्यात आलेले पहिले ट्वीट काही मिनिटांतच डिलीट करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा तेच ट्वीट पुन्हा करण्यात आले. हे ट्वीटदेखील हटवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने या हॅकिंगबाबत अधिकृतपणे माहिती दिली.पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटसोबत छेडछाड करण्यात आली. याबाबतची माहिती ट्वीटरला देण्यात आली आहे. आता त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
सीमेपलीकडून बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा : UNSC मध्ये पाकवर भारताचा गुप्त हल्ला
पाकिस्तानवर अप्रत्यक्ष हल्ला चढवताना, संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी राजदूत रुचिरा कंबोज म्हणाल्या की, भारतासमोर ड्रोनद्वारे बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा...
88 हजारांचा गुटखा माहिजळगावात जप्त
88 हजारांचा गुटखा माहिजळगावात जप्त
नगर, (दि.25 डिसेंबर) : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे एका पानटपरीवर छापा टाकून 88 हजारांचा गुटखा...
तुळजापूर ड्रग्जच्या विळख्यात : पुजारीही सामील, मंदिर संस्थानाने घेतला मोठा निर्णय
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात गेल्या 3 वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार...
मणिपूर हिंसाचार: परिस्थिती सुधारली असल्याचा दावा राज्याने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अद्ययावत स्थिती अहवाल मागवला
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मणिपूरमधील अलीकडील हिंसाचाराच्या उद्रेकाशी संबंधित याचिकेवर राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना दर्शविणारा अद्ययावत स्थिती अहवाल...




