
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदा बेन मोदी सोमवारी सायंकाळी अहिल्यानगरजवळच्या बुऱ्हाणनगरला आल्या होत्या. येथील पुरातन तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी त्या नातेवाईकांसह आल्या होत्या.
मंदिराचे पुजारी भगत परिवाराच्या वतीने ऍड. विजय भगत व ऍड. अभिषेक भगत यांनी त्यांचे स्वागत केले. देवीचा प्रसाद व साडीसोळी देऊन त्यांचा सन्मान केला. ऍड. भगत यांनी तुळजाभवानी देवी मंदिराचा पुरातन इतिहास त्यांना सांगितला. यशोदा बेन यांनी मोठ्या कुतूहलाने सर्व माहिती ऐकली. देवीचे मनोभावे दर्शन घेत आरती केली.




