पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ‘सिरम’चे CEO पुनावाला यांनी केली मोठी घोषणा

    कोरोनावरील लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार असून तिचे वितरण प्रथम भारतात केले जाणार असल्याची मोठी घोषणा सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी केली आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील मांजरी येथे असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसच्या निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

    मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे आदर पुनावाला काय बोलतात याकडे लागले होते.

    त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुनावाला यांनी ही माहिती दिली. पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.

    त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पंतप्रधान लसीच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत समाधानी आहेत.

    कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे. लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे.

    जुलै 2021 ते 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे.

    लस आहे पूर्णपणे सुरक्षित

    प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे. कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित आहे. या लसीमुळे 60 टक्के नागरिकांना रुग्णालयाची गरज पडणार नाही असेही यावेळी पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here