पंजाबरावांचा नोव्हेंबर महिन्यातील हवामान अंदाज : कसं राहणार संपूर्ण महिन्यातील हवामान ? वाचा सविस्तर

    157

    शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    तसेच आज राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी बांधला आहे. पण खूप काही मोठा पाऊस पडणार नाही असेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच राज्यात 26 ऑक्टोबर पासून थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

    विशेष म्हणजे नासिक आणि निफाड परिसरात 24 ऑक्टोबर पासून अर्थातच उद्यापासूनच थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच राज्यात आता तीन नोव्हेंबर पर्यंत प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषता दिवाळीच्या काळात यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच यावर्षी डिसेंबर महिन्यात देखील पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

    अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का?

    अरबी समुद्रात तेज नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ यमन तसेच ओमानच्या दिशेने रवाना होणार आहे. यामुळे या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नसल्याचे हवामान खात्याने आधीच स्पष्ट केले आहे. राज्यातील मुंबई सह कोकण किनारपट्टीवर तसेच गुजरात मधील किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

    खरतर अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले असल्याने याचा परिणाम महाराष्ट्रावर आणि गुजरातच्या किनारपट्टीवर होण्याचा धोका वाढला होता. मात्र चक्रीवादळाने दिशा बदलली असल्याने याचा राज्यावर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही असे हवामान खात्याने सांगितले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here