न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तान टीमला देशातून हाकलून देण्याचा इशारा
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमच्या सहा खेळाडूंना कोरोना ची लागण झाली आहे. पाकिस्तानचे खेळाडू कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करत नसल्याचा प्रकार समोर आलं आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी आता एकदा जरी नियम मोडला तर त्यांना पुन्हा पाकिस्तानला पाठवलं जाईल, असा इशारा न्यूझीलंड सरकारने दिला आहे,
वसीम खान यांनी पाकिस्तानी टीमला व्हॉट्सऍप व्हॉईस मेसेज पाठवला आहे. ‘न्यूझीलंड सरकारशी मी बोललो आहे, त्यांनी टीमने तीन ते चार वेळा नियम तोडल्यांचं सांगितलं आहे आणि आपल्याला शेवटची ताकीदही देण्यात आली आहे. हा तुमच्यासाठी कठीण काळ आहे. इंग्लंडमध्येही तुम्हाला याच परिस्थितीला तोंड द्यावं लागलं.
या गोष्टी सोप्या नसल्या तरी आपल्या देशाचा मान आणि विश्वासार्हतेचा मुद्दा आहे. या 14 दिवसानंतर तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं आणि फिरण्याचं स्वातंत्र्य मिळेल. पण आता तुम्ही नियम मोडलात तर आपल्याला पुन्हा पाकिस्तानला पाठवलं जाईल,’ असं वसीम खान म्हणाले.