न्याय न मिळाल्याने 26 जानेवारीला पालकमंत्री यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा.

    248

    खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या त्या मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.

    अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगर महापालीकेचे कर्मचारी राजेश प्रकाश तावरे यांनी दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ९.०० वा चे दरम्यान कोठला स्टॅण्ड येथे डयुटी करीत असतांना शोएब शेख याचे बरोबर ॲनिमल वेष्ट टाकण्याच्या कारणावरून वाद केला व त्यामध्ये शोएब शेख यांना दंड भरण्याच्या कारणावरून मनपा कर्मचारी व यांच्यामध्ये वाद होवुन तावरे यांनी शोएब शेख व इतर तीन अनोळखी इस्मांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ तसेच धक्काबुक्की करून दमबाजी केल्याची तक्रार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे केली. तसेच सदर प्रकरणाबाबत शोएब शेख यानी सुद्धा मनपा कर्मचारी विरुद्ध पोलीस अधीक्षक यांना तक्रारी अर्ज दिलेला असून मनपा कर्मचाऱ्यांनी मी कोटला रोड ने जात असतांना राजेश प्रकाश तावरे, विशाल अशोक खडागळे, गणेश पांडुरंग घोरपडे यांनी माझा टेम्पो कोटला स्टॅण्डच्या आलीकडे अडविला व “तुझ्या टेम्पोमध्ये ठेवलेल्या गोण्यात वास येतोय, सामान खाली उतरय” असें म्हणुन माझे गाडीतील गोण्या खाली उतरविल्या व गाडीचे व सामानाचे त्या तिघांनी फोटो काढले तसेच माला 5000 मागितले व माझ्या खिश्यातुन रु.२,०००/- काढुन घेतले. मी आरडाओरडा केल्यामुळे लोक जमा झाले तर त्यांनी मला धक्काबुक्की करून मारहाण केली. सदरचे तीनही इसम है। दारू पिलेले होते व स्वतःला अहमदनगर महानगरपालीकेचे कर्मचारी म्हणत होते. शोएब याची गाडी अडवून सरकारी पदाचा गैरवापर करत दारू पिऊन त्याचे खिशातील पैसे हिसकावुन घेतल्याबाबत तक्रार अर्ज दिलेला असून देखिल त्यांच्यावर योग्यती कायदेशीर कारवाई झाली नसुन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा 26 जानेवारीला पालकमंत्री यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे……….

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here